असं झाल तरी काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी अवघ्या 48 तासात रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू(Permission to start government medical college in Sindhudurg district) करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली आहे.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू(Permission to start government medical college in Sindhudurg district) करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली आहे.

    जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर नुकतीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती.

    खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी तशी घोषणा केली होती.मात्र,परवानगी दिल्यानंतर अवघ्या 48 तासात पुन्हा प्रस्तावात त्रुटी काढून त्यांच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.