नितेश राणे कुठं आहेत? नारायण राणे म्हणतात ‘हे सांगायला मी काय मुर्ख आहे का?’

आमदार नितेश राणे गोव्यात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय कारण सध्या त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आणि त्याच शोधकार्यात सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे गोव्यात असण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    शिवसेनेच्या नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांना राज्य सरकार अटक करणार, अशी चर्चा असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच नितेश राणे यांच्यासाठी एवढे पोलीसबळ का लावले, असा प्रश्न उपस्थित केला. नितेश राणे कुठे आहेत, यावरही राणे बोलले. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

    आमदार नितेश राणे गोव्यात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय कारण सध्या त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आणि त्याच शोधकार्यात सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे गोव्यात असण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनीही नितेश राणे यांच्याविरोधात निलंबनाच्या कारवाईची मागणी केली.राणेंकडून कृतीचे समर्थन योग्य नाही शिवसेना सदस्य सुनील प्रभू यांनीही कांदे यांच्या मागणीला पाठिंबा देत, नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली. “ज्या दिवशी हा प्रकार घडला तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही सर्वांनुमते ठरले की, नेत्यांबाबत नीट बोलले पाहीजे. पण माफी मागणे सोडाच राणे वाहिन्यांसमोर जाऊन या कृतीचे समर्थन करतात, हे योग्य नाही. चुकीला माफी नाही. त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलेच पाहिजे,” अशी भूमिका प्रभू यांनी मांडली.