kalyan criminals

गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) परिसरात घरफोडी, चोरी आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मानपाडा पोलिसांनी(manpada police) अहोरात्र नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत विशेष मोहीम राबवली होती. त्याला यश मिळाले आहे.

कल्याण : गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) परिसरात घरफोडी, चोरी आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मानपाडा पोलिसांनी(manpada police) अहोरात्र नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेला मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यातील घरफोडी,चोरी आणि चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे उघडकीस आणून बारा आरोपींना अटक(arrest) केली आहे.

कल्याण शीळ रोडवरील के झोन नावाच्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ३,३६,३७७ रुपये किमतीचे मोबाईल फोन व ३ एल.सी.डी. टीव्ही असा मुद्देमाल चोरी झाला होता. यातील चोरांबाबत कोणतीही माहिती नसताना देखील प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे तांत्रिकरित्या तपास करून शहजाद अहमद मोहम्मद शाफिक अन्सारी, समीर कदिर शेख, सद्दाम हुसैन अब्दुल सत्तार शेख यांना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, १ हायर कंपनीचा एल.ई.डी. टीव्ही, २ मोबाईल फोन असा एकूण १,१८,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच घरफोडी करणारे आरोपी शेहजाद शहाबुद्दीन मन्सुरी/शेख, मुमताज मेहराज शेख, इम्रान मकबूल खान, इरफान कुददुस शेख यांचे कडून १० मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १ सोनी कंपनीची म्युझिक सिस्टीम आणि ५ वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या असा एकूण ५१,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

तसेच गुप्त बतमीदाराच्या मदतीने चेन स्नॅचिंग करणारे आरोपी विनय प्रजापती, सुनील  जैस्वार यांनी चोरी केलेले २५,००० रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि आरोपी भावेश संदीप भोईर यांच्याकडून २२,००० रुपये किमतीची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा ऐवज हस्तगत केला.

तसेच दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी कैलास भंडारी यांच्यावर धारदार चाकूने त्यांचे पोटावर आणि छातीवर गंभीर दुखापत करून पळून गेलेले आरोपी कृष्णा दिलीप कुशलकर, शुभम सावला पेटेकर यांना खडकवासला पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अशा प्रकारे ४ घरफोडी, १ चोरी व २ चेन स्नॅचिंग, १ शरीराविरुद्धचा भा.दं.वि. कलम ३०७ चा असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून १२ आरोपीनां अटक करून त्यांचेकडून २,८७,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, सपोनि सुरेश डांबरे, पोउपनि अनंत लांब, अंमलदार पाटील, काटकर, दिलीप किरपण, विजय कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पडली.