कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३४ कोरोना रुग्णांची(Corona Patients in Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३४ कोरोना रुग्णांची(Corona Patients in Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २१ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १३४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ०७५ झाली आहे. यामध्ये १६८४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार २३५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६, कल्याण प- ३८, डोंबिवली पूर्व- ४४, डोंबिवली प- १३, तर मांडा टिटवाळा येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.