डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर ८ महिने सामूहिक बलात्कार, चौकशीमध्ये समोर आलेली माहिती ऐकून पोलिसही हादरले

डोंबिवली(Gang Rape In Dombivali) पूर्वेत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस(Manpada Police Station) ठाण्यात तिच्यावर ८ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली.या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले.

    डोंबिवली:(Dombivali) १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना(Gang Rape In Dombivali) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station)२९ जणांविरोधात गुन्हा दाखल (Crime In Dombivali)करण्यात आला आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे . या प्रकरणातील आरोपीमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.

    डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर ८ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली.या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले.जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराणे बलात्कार करत तिचा व्हिडिओ काढला .हा व्हिडिओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडिओच्या आधारे आतापर्यंत २९ जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर,रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामधील दोन अल्पवयीन आहेत .या प्रकरणात २१ आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.