galaxy hospital relative crowd

गॅलेक्सी हॉस्पिटलच्या(Galaxy Hospital) निष्काळजीपणामुळे राघवेंद्र मिश्रा या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू (22 Year OLd Man Died Due To Careless Behaviour Of Hospital) झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

    मीरा भाईंदर: मिरा रोडच्या(Mira Road) गॅलेक्सी हॉस्पिटलच्या(Galaxy Hospital) निष्काळजीपणामुळे राघवेंद्र मिश्रा या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू (22 Year OLd Man Died Due To Careless Behaviour Of Hospital) झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये राघवेंद्रला दाखल करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांकडे ४० हजारांचे इंजेक्शनची मागणी करण्यात आली. नंतर पाच हजारांचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगण्यात आले. त्यात गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांना न विचारता पाच हजारांचे इंजेक्शन दिले. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे राघवेंद्रचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांकडून होत आहे.

    दरम्यान राघवेंद्रचा मृतदेह डॉ.पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र कुटुंबातील सदस्यांनी शवविच्छेदन केंद्राबाहेर ठिय्या मांडला आहे.जोपर्यंत रुग्णालय व्यवस्थापन व डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबातील सदस्यांनी घेतला आहे.