डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली ३३ वर, २८ जणांना पोलिसांनी केली अटक

डोंबिवलीत (Dombivali Gang Rape)अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात कालपर्यंत २६ जणांना पोलिसांनी अटक(Arresat In Dombivali Gang Rape Case) केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

    डोंबिवली: डोंबिवलीत (Dombivali Gang Rape)अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ३३ आरोपींची नावे समोर आली आहेत. यामधील २८ आरोपींना(28 Persons Arrested) अटक करण्यात आली आहे. तसेच पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

    सामूहिक बलात्कार प्रकरणात कालपर्यंत २६ जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या २८ वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

    प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडिओ काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.