दिलासादायक बातमी – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

कल्याण डोंबिवलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू (Corona Death) झाला नसून आज ३२ कोरोना रुग्णांची(Corona patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू (Corona Death) झाला नसून आज ३२ कोरोना रुग्णांची(Corona patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    आजच्या या ३२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ९७८ झाली आहे. यामध्ये १३०६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ४६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-६, कल्याण प – १०, डोंबिवली पूर्व – १०, तर डोंबिवली पश्चिम येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.