33 people involved in gang rape case in Dombivali

डोंबिवलीत (Dombivali Gang Rape)अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील २9 आरोपींना(29 Persons Arrested) अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान सामूहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी एक रिक्षा ताब्यात घेतली आहे. 'याच' रिक्षातून आरोपी तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे.

    डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali Gang Rape)अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील २9 आरोपींना(29 Persons Arrested) अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान सामूहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी एक रिक्षा ताब्यात घेतली आहे. ‘याच’ रिक्षातून आरोपी तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे.

    डोंबिवलीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एकूण 29 आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणात आज आज तीन दिवसानंतर पीडित मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी MH 0J 3073 क्रमांकाची एक रिक्षा जप्त केली आहे.

    आरोपी याच रिक्षाने त्या मुलीला बलात्काराच्या घटनास्थळी घेऊन जात व बलात्कार झाल्यानंतर तिला पुन्हा घरी आणून सोडत असल्याचे प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

    तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या सुटकेसाठी एकूण चार वकिलाने वकील पत्र दिले असून यामध्ये 19 आरोपी साठी एका महिला वकिलांनी वकील पत्र दिले आहे.

    पीडित तरुणीचा प्रियकरच यातील मुख्य आरोपी आहे. जानेवारी महिन्यात त्याने पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडिओ काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.