street dog

अंबरनाथमध्ये (ambernath) भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला जबर जखमी(dogs attack on 4 year old boy) केले आहे. सुदैवाने स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना हुसकावून लावल्याने या मुलाचा जीव वाचला आहे.

    अंबरनाथ : अंबरनाथ(ambernath) येथील शंकर हाईट फेज टू या इमारतीच्या आवारात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला जबर जखमी(dogs attack on 4 year old boy) केले आहे. सुदैवाने स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना हुसकावून लावल्याने या मुलाचा जीव वाचला आहे.

    अंबरनाथ ( प ) भागातील शंकर हाईट या इमारतीत प्रफुल्ल लोहार हे त्यांच्या कुटुंबासह राहतात, आज सकाळी प्रफुल्ल यांचा चार वर्षीय मुलगा सुमेध प्रफुल्ल लोहार हा त्याच्या मित्रांसोबत इमारतीच्या आवारात खेळत असताना तीन ते चार कुत्र्यांनी अचानक सुमेध वर हल्ला केला. सुमेध याने कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांपासून पासून बचाव करताना सुमेध हा जमिनीवर पडला, याच वेळी या भटक्या कुत्र्यांनी सुमितला पाठीवर चावा घेत त्याला गंभीर जखमी केले आहे.

    यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरित सुमेधच्या दिशेने धाव घेऊन त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर कुत्रे तिथून पळून गेले. कुत्र्यांच्या या हल्ल्यात सुमितच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून नगरपालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे .