कल्याण डोंबिवलीत ५९१ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना(corona) रुग्णांच्या संख्येने ३३ हजारांचा आकडा तर मृतांच्या संख्येने ७०० चा आकडा पार केला आहे. आज नव्या ५९१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ५९१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३३,५२० झाली आहे. यामध्ये ४५९५ रुग्ण उपचार घेत असून २८,२१७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आजच्या ५९१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ८३, कल्याण प.- १७८, डोंबिवली पूर्व १९५, डोंबिवली प- १०६, मांडा टिटवाळा – २२, मोहना – ४, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १२ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.