कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६७ रुग्णांची नोंद, ११३ जण कोरोनामुक्त

गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये(Kalyan Dombivali) ११३ कोरोना रुग्णांना(Corona Patients) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ६७ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये ११३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

    आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार २३० झाली आहे. यामध्ये ११६६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ८५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९, कल्याण प – १६, डोंबिवली पूर्व – २५, डोंबिवली पश्चिम – १५, मांडा टिटवाळा – १, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.