कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी ७२८ उमेदवारी अर्ज दाखल

कल्याण तालुक्यातील (Kalyan taluka) २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat elections) बिगुल वाजले असुन कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील ७४ प्रभागांच्या निवडणुकीसाठी अर्ज (Application) दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता.

कल्याण : कल्याण तालुक्यातील (Kalyan taluka) २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat elections) बिगुल वाजले असुन कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील ७४ प्रभागांच्या निवडणुकीसाठी अर्ज (Application) दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. बुधवारी शेवटच्या दिवशी तब्बल ३८८ अर्ज दाखल झाले असून आजपर्यंत एकूण ७२८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी ३१ तारखेला या अर्जाची तपासणी असून १ तारखेला ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असल्याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली.

दरम्यान ७४ प्रभागांच्या २११ जागांकरीता तब्बल ७२८ अर्ज दाखल झाल्याने आता तालुक्यात ख-या अर्थाने निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी कल्याणातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रावर एकच गर्दी केल्याने या ठिकाणी सोशल डीस्टन्सिंग नियमांची ऐसी तैसी झाल्याचे चित्र दिसत होते.