कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे गेल्या २४ तासांमध्ये एकही मृत्यू नाही, ७९ नव्या रुग्णांची भर

कल्याण डोंबिवली(kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ७९ कोरोना रुग्णांची(Corona patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ७९ कोरोना रुग्णांची(Corona patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.

    आजच्या या ७९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ९४६ झाली आहे. यामध्ये १३९९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ३४३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    आजच्या ७९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३, कल्याण प- २५, डोंबिवली पूर्व – २४, डोंबिवली प – ५, मांडा टिटवाळा -१० तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.