कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ९६ नव्या रुग्णांची भर,११६ जणांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ९६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ९६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ११६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.

    आजच्या या ९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार १६३ झाली आहे. यामध्ये १२१३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ७४५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – २१, डोंबिवली पूर्व – २९, डोंबिवली पश्चिम – ३०, मांडा टिटवाळा – ४, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.