कल्याण डोंबिवलीमध्ये ९९ कोरोना रुग्णांची नोंद, १३४ जणांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ९९ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ९९ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये १३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

    आजच्या या ९९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ५२४ झाली आहे. यामध्ये ११४७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार १६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – २८, डोंबिवली पूर्व – ३४, डोंबिवली पश्चिम – २१, मांडा टिटवाळा – ४, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.