A fire breaks out at a chemical company in Ambernath

केमिकल कंपनी बंद होती. परंतु या कंपनीतील वेस्टेज रेल्वे रुळाच्या बाजूला काही अंतरावर होते. याच वेस्टेजला आग लागली होती. कंपनीच्या बाजूलाच काही अंतरावर असलेल्या रुळावर एक रेल्वेगाडी उभी होती.

अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath) रेल्वे स्थानकाच्या बाजूला लागून असलेल्या केमिकल कंपनीत (chemical company)  भीषण आग ( fire breaks out ) लागली आहे. ही केमिकल कंपनी बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कंपनीतील वेस्टेजने पेट घेतल्याने आगीचे मोठे मोठे लोंढे रेल्ले रुळाच्या बाजूला लोटले होते. आग लालगेली बोरेक्स कंपनी ही अंबरनाथ शहातील पश्चिम भागात रेल्वे रुळाच्या बाजूला आहे.

केमिकल कंपनी बंद होती. परंतु या कंपनीतील वेस्टेज रेल्वे रुळाच्या बाजूला काही अंतरावर होते. याच वेस्टेजला आग लागली होती. कंपनीच्या बाजूलाच काही अंतरावर असलेल्या रुळावर एक रेल्वेगाडी उभी होती. या आगीने रौद्ररुप धारण केल्यावर मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु या अग्निशमण दलाच्या जवानांनी वेळीच पाचारण केल्यामुळे आग पसरण्यापासून रोखण्यात आली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या होत्या. आग लागलेल्या कंपनीचे नाव बोरेक्स केमिकल कंपनी असल्याचे समजते आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.