प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबईतील (Navi Mumbai) सहा बारमध्ये (Bar) रात्री खुलेआम ऑर्केस्ट्रा (Orchestra) व वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू असल्याचे  व्हिडिओ क्लिपमध्ये आढळून आले आहे. ओमयक्रॉनचे संकट घोंगावत असताना व राज्य सरकारने नियमावली जाहीर केलेली असताना हे बार खुलेआम सुरू ठेवून जमावबंदीचे उल्लंघन सुरू असल्याचे समोर आले होते.

  नवी मुंबई : ओमयक्रॉनचे (Omicron) संकट देशासह राज्यावर देखील घोंघावत आहे. ख्रिसमस व न्यू इयरच्या सेलिब्रेशनला (Christmas and New Year Celebrations) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने  रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात कलम १४४ (जमावबंदी) लावण्यात आली आहे. मात्र असे असताना  पण नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) सर्रास डान्स बार (Dance Bar) सुरू असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध करताच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत सरकारला जाब विचारला. त्याची दखल राज्य शासनाने घेऊन बारच्या ऑर्केस्ट्राचे (Orchestra) परवाने निलंबित करत बारमालकांना दणका दिला.

  नवी मुंबईतील (Navi Mumbai) सहा बारमध्ये (Bar) रात्री खुलेआम ऑर्केस्ट्रा (Orchestra) व वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू असल्याचे  व्हिडिओ क्लिपमध्ये आढळून आले आहे. ओमयक्रॉनचे संकट घोंगावत असताना व राज्य सरकारने नियमावली जाहीर केलेली असताना हे बार खुलेआम सुरू ठेवून जमावबंदीचे उल्लंघन सुरू असल्याचे समोर आले होते.  नवी मुंबईच्या वाशी रोड येथील भारती डान्सबार,राजमहाल, एमएच ४३, मॅग्नेट बार, मेट्रो बार, व्हाईट हाऊस बार मध्ये देखील वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले होते.  येथे मुलींच्या दिसण्यावरून त्यांचे दर ठरवले जात असल्याचे या व्हिडिओ क्लिपमध्ये आढळून आले. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांचे दर कमी- जास्त होत असल्याचे दिसून येत  होते.

  साधारण एका मुलीचा तीन हजार रुपये मुलीचा दर असल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यावर राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

  फडणवीसांनी नवी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारा हा आधिकारी करतोय काय? असा सवालच उपस्थित केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बाब गंभीर्याने घेत तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने  ४ बारची ऑर्केस्ट्रा परवानगी निलंबित केली. तर उर्वरित दोन बारवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

  नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

  खुलेआम सुरू असलेले नवी मुंबईतील बारचा विषय विधानसभेत गाजल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी करतात काय असे म्हणत नवी मुंबई पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे येत्या काळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आयुक्तांबाबत काय निर्णय घेतात? व पोलीस आयुक्त आपल्या कर्तव्याला जागत बार संस्कृतीवर जरब बसवतात का ते पाहावे लागणार आहे. मात्र या घटनेने नवी मुंबई पोलिसांची नाचक्की होऊन पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.