संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आता बिबट्याचे दर्शन बदलापूर पश्चिमेकडेही झाले असल्याची माहिती आहे. बदलापूर पश्चिमेकडे असलेल्या मोपल सिटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे. एका महिलेने बिबट्याच्या हालचालींचा व्हिडिओही केल्याची माहिती आहे. वनिवाभागानेही या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बदलापूर पूर्वेसह, बदलापूर पश्चिम या परिसरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    बदलापूर – ठाणे  ( Thane) जिल्ह्यातील बदलापूरच्या ( Badlapur) पूर्वेच्या डोंगराळ परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या (leopoard in Badlapur)  असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. शिरगावाच्या सीमेवर असलेल्या नव्या पनवेल हायवेवर अनेक जण सकाळी आणि संध्याकाळी इव्हिनिंग वॉकसाठी येतात, संध्याकाळी या परिसराला तर चौपाटीचे स्वरुप आलेले असते, त्यातच एका आठवड्यापूर्वी या परिसरात बिबट्या असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. या परिसरात छोट्या टेकड्यांवरही काही पाड्यांमध्ये वस्ती आहे, त्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांत अनेक आदिवासी बांधव आपल्या पशु-प्राण्यांसह राहतात, त्यांच्यातही यानिमित्ताने काही काळ दशहत निर्माण झाली होती, त्या बिबट्याचा फोटो असलेली पोस्टही व्हारल होत होती. आता मात्र आठवडाभरानंतर त्यात वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

    आता बिबट्याचे दर्शन बदलापूर पश्चिमेकडेही झाले असल्याची माहिती आहे. बदलापूर पश्चिमेकडे असलेल्या मोपल सिटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे. एका महिलेने बिबट्याच्या हालचालींचा व्हिडिओही केल्याची माहिती आहे. वनिवाभागानेही या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बदलापूर पूर्वेसह, बदलापूर पश्चिम या परिसरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    बदलापूर परिसर हा डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे. पूर्वेच्या परिसरात चिखलोली धरण, तर सह्याद्रीची हाजीमलंग डोंगराची शृंखलाच या परिसरात आहे. या डोंगरानजिकच गेल्या काही काळात शहराचा विस्तार झाला आहे. तर पश्चिमेकडे बारवी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात मोठे घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात रानगव्यांसह अनेक जंगली जनावरांचा वावर नेहमीचाच आहे. आता या परिसरात बिबट्या वावरत असल्याचे वृत्ताने शहरवासियांमध्ये थोडी चिंता पसरली असली, तरी यानिमित्ताने या परिसरातील वनांवर शिक्कामोर्तब झाले आहे.