गृहमंत्र्यांनी पडघा आरोग्य केंद्रात कोरोना योद्ध्यांना दिले फेस शिल्ड कीट, राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वाटप

भिवंडी: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात त्यांनी कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आणि आपले कर्तव्य बजावणारे आरोग्य विभागातील

 भिवंडी: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात त्यांनी कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आणि आपले कर्तव्य बजावणारे  आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रवादी डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्ड किटचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार सरकारी व खाजगी डॉक्टरांना फेस शिल्ड’वाटप करण्यात आले असून आजपासून पूर्ण महाराष्ट्रात  सरकारी रुग्णालयात आशा वर्कर, वॉर्ड बॉय, यांना फेस शिल्ड वाटपाला सुरुवात झालेली आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाशा कलावंत आहेत. त्यांच्यावर कोरोनाचे आर्थिक संकट आल्याने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, च्या माध्यमातून ३००० तमाशा कलावंतांच्या  बँक खात्यामध्ये प्रत्येकी  तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. असे विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, च्या माध्यमातून  महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा दिवस-रात्र कोरोनाच्या लढ्यात काम करत आहेत. ज्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्या सूचनेचे पालन सर्वांनी करावं. या अगोदर असं कधी संकट आलेले नाही पण आता या संकटाला आपल्या सर्वांना सामोर जावे लागत आहे. जी शासकीय यंत्रणा आहे त्यांना सहकार्य केलं तर १००℅ या कोरोनाच्या  लढ्यामध्ये  महाराष्ट्र विजय झाल्याशिवाय राहणार नाही असे देखील  गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी बोलताना सांगितले.
यावेळी गृहमंत्री  अनिल देशमुख, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील, बांधकाम सभापती वैशाली चंदे,पडघा वैद्यकीय अधिकारी शामशिंग पावरा  आदी उपस्थित होते.