प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अफगाण(Afghanistan And Iran Businessmen) आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतील कोल्ड स्टोरेजमधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार (Illegal Business) सुरु केला होता. त्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफ्को हद्दीतील चार कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या (APMC Administration Raid On 4 Cold Storage) आहेत.

    नवी मुंबई : थेट पणनच्या नावाखाली मुंबईत (Mumbai) घुसलेल्या अफगाण(Afghanistan And Iran Businessmen) आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतील कोल्ड स्टोरेजमधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार (Illegal Business) सुरु केला होता. त्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफ्को हद्दीतील चार कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या (APMC Administration Raid On 4 Cold Storage) आहेत.

    सकाळी संचालकांनी तर संध्याकाळी सातनंतर एपीएमसी दक्षता पथकाने कारवाईला सुरुवात केली. दररोज या अवैध व्यापारातून तब्बल २० कोटींची उलाढाल होते. अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांची ही करमुक्त उलाढाल वर्षाकाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. दक्षता पथकाने युपी कोल्ड स्टोरेज, प्रभु हिरा कोल्ड स्टोरेज, क्रिसेंट कोल्ड स्टोरेज आणि जीएचके कोल्ड स्टोरेज या चार कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या. यावेळी सुरु असलेला व्यापार बघून एपीएमसी अधिकारीही थक्क झाले.