कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी प्रकाश पेणकर
कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी प्रकाश पेणकर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी नियुक्ती केली आहे.

कल्याण (Kalyan). कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी नियुक्ती केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस दामोदर हरीभाऊ सुर्यराव यांचे अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरचिटणीस पदावर जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना हि १९९५ पासून कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे. या संघटनेचे उपाध्यक्ष पद पेणकर हे चार वर्षांपासून सांभाळत होते. कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्याप्रमाणे ७ व्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे करण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे यावेळी प्रकाश पेणकर यांनी सांगितले.