कल्याणात लवकरच ऑटोरिक्षा प्रिपेड सेवा ; सेंट्रल रेल्वे, आरटीओची मान्यता

प्रिपेड ऑटोरिक्षा भाडेदर आरटीओ नियम व टेरिफ मिटर प्रणाली नुसार सुयोग्य भाडे दर आकारणी निश्चित आहे. शासन, आरटीओ नियमानुसार अत्याधुनिक प्रणालीचा वापर करुन प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा सुविधा सॉफ्टवेअर विकासित केले आहे.

  • रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर करणार नियोजन

कल्याण : रिक्षा प्रवास करतांना प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात अनेकवेळा भाडेदरामुळे वाद होत असतात. यावर तोडगा म्हणून विमानतळावर ज्याप्रमाणे प्रिपेड टॅक्सी सेवा देण्यात येते त्याचधर्तीवर कल्याणमधील रिक्षा प्रवाशांच्या सोयीसाठी प्रिपेड रिक्षा प्रवास सेवेला सेट्रंल रेल्वे व आरटीओने मान्यता दिली आहे. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर या प्रीपेड रिक्षा सेवेचे नियोजन करणार असून लवकरच हि सेवा कार्यान्वित होणार आहे.

प्रिपेड ऑटोरिक्षा भाडेदर आरटीओ नियम व टेरिफ मिटर प्रणाली नुसार सुयोग्य भाडे दर आकारणी निश्चित आहे. शासन, आरटीओ नियमानुसार अत्याधुनिक प्रणालीचा वापर करुन प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा सुविधा सॉफ्टवेअर विकासित केले आहे. रिक्षा प्रवासी नागरीकांना इच्छीत स्थळी प्रवास करताना प्रिपेड रिक्षा सेवा केद्रांवर रिक्षाचालकाचे नाव, मोबाईल नबंर, रिक्षा नबंर, प्रवासी नाव, मोबाईल नंबर, इच्छित प्रवास स्थळ, मिटर प्रणाली नुसार निश्चित भाडेदर रिसीट मिळणार आहे.

प्रिपेड ऑटोरिक्षा प्रवासाची व्याप्ती हि कल्याण डोबिंवली महापालिकाक्षेञ, एमएमआरडी क्षेत्र व इतर शहरात प्रवास करता येणार आहे. प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा सुविधेचे संचलन रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर करणार आहे. कल्याण पश्चिमेतील मुख्य तिकीटघराच्या समोर हे प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा केंद्र असणार आहे. कोरोना आपत्तकालिन परस्थितीत लॉकडाऊन, संचारबंदी कारणास्तव प्रिपेड ऑटो रिक्षासेवा सॉफ्टवेअर प्रणाली अपडेट करणे प्रलंबित आहे. या सोयीमुळे रिक्षा प्रवास तक्रार विरहीत होणार असून हि सुविधा नागरीकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले.