कल्याण डोंबिवलीकरांनो काळजी घ्या, दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं. डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आङे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

    मिळालेल्या अधीक माहितीनुसार, या रुग्णाला कोरोना विषाणूचा नवा व्हिरियंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत.

    सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं.

    डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आङे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे भारतासह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये दोन दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने घबराट पसरली आहे. चांगली बातमी अशी आहे की दोघांनाही ओमिक्रॉनची लागण झालेली नाही. त्यांना डेल्टा प्रकाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.