स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा- भिवंडी तहसिल कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

भिवंडी :भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कार्यालयाच्या आवरातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे.सरकारी कामकाजासाठी येणाऱ्या शेकडो अभ्यागतांना नाक मुठीत धरूनच नैसर्गिक विधी

 भिवंडी :भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कार्यालयाच्या आवरातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे.सरकारी कामकाजासाठी येणाऱ्या शेकडो अभ्यागतांना नाक मुठीत धरूनच नैसर्गिक विधी उरकावा लागत असल्याने तहसीलदारांच्या बेजबाबदार कृतीने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने तहसील कार्यालय शासनाच्या ‘ स्वच्छ भारत ‘ मोहिमेल हरताळ फासून फक्त कागदावर स्वच्छता मोहीम दाखवत असल्याचे आरोप मनसे शहराध्यक्ष मनोज गुळावी यांनी केला आहे.  भिवंडी तहसील कार्यालय अस्वच्छतेचे कोठार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून उघड झाले आहे.

भिवंडीतील तहसील कार्यालयाच्या आवारात सर्कल, तलाठी , रजिष्टर ऑफिस,तालुका पोलीस ठाणे, ग्रामीण रेशनिंग कार्यालय, लगतच डिसीपी कार्यालय ,सेतू कार्यालय ,पंचायत समिती कार्यालय  आदी महत्वाची कार्यालये आहेत. शहर व ग्रामीण  भागातून शेतकरी,नागरिक,महिला,विद्यार्थी  मोठ्या संख्येने दररोज तहसील कार्यालयाच्या आवारात कामानिमित्ताने येत असतात. मात्र तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांसाठी स्वच्छतेसाठी कोणतीच सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. महत्वाची बाब म्हणजे येथे लाखो रुपये खर्च करून भिवंडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने देखाव्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहात पाणीच नाही.त्यामुळे २० रुपयाच्या बाटल्या घेवून शौचालयाचा वापर ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागत आहे.पाणी नसल्याने दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. यामधील मुतारीची भयानक अवस्था असल्याने नाक मुठीत धरूनच मुतारीचा वापर करावा लागत आहे. महिला, मुलींची तर मोठी नामुष्की होत आहे. केंद्र व राज्यशासन स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना तहसील कार्यालयात दुर्गंधी कशी? असा सवाल मनसे शहराध्यक्ष मनोज गुळावी यांनी उपस्थित केला आहे. येत्या आठवड्यात या शौचालय व मुतारीची साफसफाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे