अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव, भाजपाच्या शिक्षक आघाडीचा आरोप

शाळेतील(school) शिपायांची पदे ठोक पद्धतीने भरून अनुदानित शिक्षणच(education) बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव(mahavikas aghadi) असून तातडीने हा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे(bjp teachers front) अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.

कल्याण : शाळेतील(school) शिपायांची पदे ठोक पद्धतीने भरून अनुदानित शिक्षणच(education) बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव(mahavikas aghadi) असून तातडीने हा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे(bjp teachers front) अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.

भाजपा सरकारने शाळांसाठी जाहीर केलेले अनुदान थांबविणे, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचा १९ महिन्यांचे वेतन न देणे, शिक्षकांच्या भरतीमध्ये पारदर्शकता आणणारी पवित्र पोर्टलची भरती एक वर्ष न करणे म्हणजे अनुदानित शिक्षण संपविण्याचा प्रकार असल्याचेही बोरनारे यांनी म्हटले आहे.

शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सेवक वर्ग हा महत्वाचा घटक असतानादेखील त्या पदाचे खाजगीकरण करणे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी शिक्षणातील गोंधळ दूर होत नसून शैक्षणिक संस्थांना आरटीई प्रवेशाची प्रतिपूर्तीची लाखो रुपयांची थकबाकी, संस्थांच्या वेतनेतर अनुदानाची रक्कम अद्यापही अनेक शाळांना पोहचले नसल्याने शाळांचा इतर खर्च कसा भागवावा.असा प्रश्न शाळांना पडला आहे.