bjp protest against patole in kalyan

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ (Nana Patole Video) समोर आला असून त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कल्याणातही (Kalyan) भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे  (Shoes Hitting At Nana Patole Photo) मारत निषेध व्यक्त केला.

    कल्याण : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटताना दिसत असून कल्याणातही (Kalyan) भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे  (Shoes Hitting At Nana Patole Photo) मारत निषेध व्यक्त केला. कल्याण पूर्वेतील काटेमानीवली (Katemanivali) येथे झालेल्या या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नरेंद्र सूर्यवंशी, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, संदीप तांबे, नितेश म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षे व्यवस्थेतील त्रुटीनंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडून करण्यात आलेले हे वक्तव्य संशयास्पद असल्याचे सांगत आघाडी सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपतर्फे करण्यात आली.

    तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई केली तशी कारवाई करण्याची हिंमत आघाडी सरकारने दाखवावी अशी संतप्त मागणीही यावेळी कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली. दरम्यान कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात झालेल्या यानिदर्शनावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक केला. तसेच यावेळी कोळसेवाडी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदनही भाजपतर्फे देण्यात आले.