अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला अटक, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा(Molestation) धक्कादायक प्रकार कल्याण (Kalyan Crime) पूर्वेत उघडकीस आला आहे.

    कल्याण : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा(Molestation) धक्कादायक प्रकार कल्याण (Kalyan Crime) पूर्वेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात(Tilaknagar Police Station) या आरोपीविरोधात गुन्हा(Crime) दाखल करून त्याला अटक केली आहे. पप्पू सहानी(Pappu Sahani) असे या आरोपीचे नाव असून तो मुलुंड(Bjp worker Arrested In Molestation Case) येथे भाजपचा गटप्रमुख आहे व कल्याण पुर्वेकडील न्यू गोविंदवाडी परिसरात राहणारा आहे.

    काल रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर मुलगी ही राहत्या घराच्या परिसरात लहान मुलांची शिकवणी घेते. आरोपीची मुलगीदेखील पिडीतेकडे शिकवणीसाठी येत होती. काल सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी त्या मुलीला घरी सोडण्यास गेली. पप्पू सहानी याने तिला रस्त्यातच गाठलं अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरड केला असता तो तिथून पळून गेला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू सहानी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.