Bogus farmer certificate case handed over to Palghar District Collector Inquiry withdrawn from Thane District Collector nrvb
पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले बोगस शेतकरी दाखले प्रकरण; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतली चौकशी

हरकतीत आलेल्या महसूल विभागाच्या कोकण आयुक्तांनी कारवाई करीत या आदिवासींच्या जमिनी हडपण्याच्या या प्रकरणात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हटवून हे प्रकरण पालघर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी साठी सोपविण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण ग्रामीणच्या कांबा, वाघेरे पाडा , वरप गाव परिसरातील आदिवासी गरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणाची चौकशी ही आता ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून काढून पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. गरीब आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बोगस शेतकरी दाखले जोडून हडप करण्यात आली होती. आता या प्रकरणात आरोपीना संरक्षण देणाऱ्या प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

या प्रकरणात पीडित आदिवासी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांच्याद्वारे बोगस शेतकरी दाखल्याबाबत अनेक वेळा सर्व दस्तावेज पुराव्या सह देऊन प्रशासनास सूचना देऊनही स्थानिक तहसील व प्रांत आणि जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारने संबंधित विभागास चुकीचा रिपोर्ट देऊन दिशाभूल करण्यात आली होती. विधानसभा अधिवेशनात देखील या प्रकरणात चुकीचे रिपोर्ट देण्यात आले होते.

या प्रकरणात आदिवासींच्या बाजूने पाठपुरावा करणारे विशाल कुमार गुप्ता यांच्या द्वारे दिले गेलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारच्या विभागाद्वारे महसूल विभागला सूचना देण्यात आल्या. यानंतर हरकतीत आलेल्या महसूल विभागाच्या कोकण आयुक्तांनी कारवाई करीत या आदिवासींच्या जमिनी हडपण्याच्या या प्रकरणात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हटवून हे प्रकरण पालघर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी साठी सोपविण्यात आले आहे.

राजस्थानच्या जिल्हा सीरोही तालुका शिवगंज गाव मनादरच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, प्रकाश रेवाचंद बुधराणी हा येथील रहिवासी नाही आणि शेतकरीही नाही. बोगस शेतकरी दाखलाच्या आधारे गरीब आदिवासींची जमीन हडपण्याच्या या प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश रेवाचंद बुधराणी व त्यांचे कुटुंबीय निशा, गिरीश, विशाल आणि शीतलच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळी दोन प्रकरणेही दाखल आहेत. या भूमाफियांना झुकते माप देणाऱ्यांकडून हे प्रकरण काढून ते पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.या कारवाईमुळे गरीब आदिवासींना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाल्याचे दिसून आहे. आता पालघर जिल्हाधिकारी या प्रकारणाला कशा प्रकारे न्याय देतात हे पाहावे लागेल.