khopat depot

एस.टी. महामंडळाच्या (st)खोपट आगारातील(khopat depot) बसेसला डिझेल पुरविणाऱ्या पंपाची ६५ लाख(65 lakh ruppes bill pending of diesel pump) रुपयांची रक्कम थकीत झाल्याने ठाण्याच्या खोपट आगारातील तब्बल शेकडो एसटी बसेसना ब्रेक लागला आहे

  ठाणे : एस.टी. महामंडळाच्या (st)खोपट आगारातील(khopat depot) बसेसला डिझेल पुरविणाऱ्या पंपाची ६५ लाख रुपयांची रक्कम थकीत झाल्याने ठाण्याच्या खोपट आगारातील तब्बल शेकडो एसटी बसेसना ब्रेक लागला आहे. डिझेल अभावी त्या आगारातच विसावल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. तसेच आरक्षण केलेल्या प्रवाशांना आरक्षण रद्द करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  घरघर लागलेल्या एसटी महामंडळाचे ग्रहण सुटेनासे झाले आहे. दरम्यान डिझेल बिल न दिल्याने आणि एसटी आगारातच उभ्या राहिल्याने महामंडळाला तब्बल १४ लाखांचा फटका बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी संख्या असलेल्या खोपट एसटी आगाराची दयनीय अवस्था समोर आली आहे.

  डिझेल नसल्याने ४० ते ५० बसेस या आगारातच उभ्या होत्या. खोपट आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये शिवशाही, शिवनेरी बसेसचा देखील समावेश आहे. ठाण्याच्या खोपट आगारातून कोकणातील सर्व मार्गावर जाणाऱ्या गाड्या सुटतात त्याशिवाय सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव,तुळजापूर,अक्कलकोट,वडूज, अलिबाग, पंढरपूर मार्गावर धावतात. सोमवारी दुपारनंतर डेपोत शुकशुकाट होता.

  खोपट आगारात येणाऱ्या १३ मुक्कामी बसेसनाही याचा फटका लागलेला आहे. बसेसना डिझेलची व्यवस्था नसल्याने बसेस जागेवरच आगारात उभ्या होत्या. मंगळवारची आरक्षण असलेल्या बस प्रवाशांची झुंबड आरक्षण रद्द करण्यासाठी उडाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आगारात कामावर आलेल्या बस चालक आणि वाहक याना घरी पाठविल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

  पाच दिवसाचे डिझेल पंपाचे बिल ६५ लाखाच्या घरात असल्याने पंप मालकांनीही असहकार्याचे धोरण अवलंबिल्याचे समोर आले. खोपट आगारातील बसेसना इंधन पुरवठ्यासाठी रोज २० हजार लिटर पेक्षा अधिक डिझेल लागतात आहे. तर ठाण्याच्या खोपट आगारातील बसेसना १० ते १२ हजार लिटर डिझेल लागत आहे.

  होळीकरिता कोकणात निघालेल्या आणि आरक्षण केलेल्या प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला. अनेक प्रवाशी काहीतरी व्यवस्था होईल या आशेवर बसेसची वाट पाहत होते. दरम्यान खोपट डेपोचे विभागीय नियंत्रक विनोद कुमार भालेराव यांनी मात्र डिझेलच्या थकीत देणी न दिल्याने एसटी बसेस जागेवर राहिल्या, बिल दिल्यानंतर एसटी बसेस पुन्हा पूर्वपदावर येतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.