चिनी वस्तूंची राष्ट्रमंथनने केली होळी

कल्याण : लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन सैन्याने केलेल्या भ्याड हल्यात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रमंथन संस्थेने चिनी

 कल्याण : लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन सैन्याने केलेल्या भ्याड हल्यात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रमंथन संस्थेने चिनी वस्तूंची होळी केली. राष्ट्रमंथन संस्थेच्या अॅड. राखी बारोड यांच्या नेतृत्वाखाली चिनी सैनिकांनी केलेल्या नपुसंक कामाचा चिनी वस्तू जाळून आणि मोबाईलमधील चिनी अॅप्लिकेशन डिलीट करून चीनचा निषेध करण्यात आला. यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. चीन सैन्याचे हे कृत्य अतिशय निंदनीय असून अशा कठीण प्रसंगी आम्ही भारतीय सैन्यासोबत असल्याची भावना अॅड. राखी बारोड यांनी व्यक्त केली. या आंदोलनात स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह रोहित पांडेय, राष्ट्र सेविका समितीच्या रश्मि पांडेय, भाजपाचे  नथु यादव, अमित बारोड, आकाश रंदिवे, भीम यादव, शाश्वत पांडेय, राहुल सोनी, राज गुप्ता, जवाहर यादव, रामबाबू यादव, मनीष कांबळे आदीजण सहभागी झाले होते.