ठाण्यात राबोडी आणि कापूरबावडी परिसरातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची छापेमारी

ठाणे परिसरात विनापरवाना सुरु असलेल्या राबोडी परिसरातील आणि कापूरबावडी परिसरातील अशा दोन हुक्का पार्लरवर कारवाई करून तब्बल ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली.

  • राबोडीत १४ वर तर कापूरबवाडीत २९ लोकांवर कारवाई

ठाणे (Thane).  ठाणे परिसरात विनापरवाना सुरु असलेल्या राबोडी परिसरातील आणि कापूरबावडी परिसरातील अशा दोन हुक्का पार्लरवर कारवाई करून तब्बल ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असताना बेकायदेशीर चालणार्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत आणि आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे पथक यांनी राबोडीत सुरु झालेल्या फिल्टर रेस्टोरेंट व हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली.

पार्लरचे कर्मचारी आणि ग्राहक अशा १४ जणांवर पोलीस पथकाने कारवाई केली. तर दुसरी कारवाई कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोध कॉम्प्लेक्स जवळ सर्विसरोड जवळ ३६० नावाच्या हक्क पार्लरवर छापेमारी केली. यावेळी पोलीस पथकाने २९ जणांवर कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.