d b patil fellowship

दि.बा.पाटील यांच्या सन्मानार्थ व स्मृती प्रित्यर्थ  ‘दि.बा.पाटील फेलोशिप’ (D. B. Patil Fellowship) अर्थात पाठ्यवृत्तीची आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Announcement About D B Patil Fellowship) यांनी घोषणा केली. 

    नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त व आगरी – कोळी, कऱ्हाडी बांधवांचे नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या सन्मानार्थ व स्मृती प्रित्यर्थ  ‘दि.बा.पाटील फेलोशिप’  (D. B. Patil Fellowship) अर्थात पाठ्यवृत्तीची आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Announcement About D B Patil Fellowship) यांनी घोषणा केली.  पोस्टरचे अनावरणही राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमास मनापासून शुभेच्छा देत, या उपक्रमातून महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर अभ्यास होईल व हा सर्व अभ्यास महाराष्ट्रासमोर यावा अशी सूचना याप्रसंगी राज ठाकरे यांनी संयोजकांना केली. याप्रसंगी या फेलोशिपचे समन्वयक नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे उपस्थित होते. तसेच यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे उपस्थित होते.

    दि.बा.पाटील यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ही फेलोशिप सुरू केल्याचे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दि.बा. यांचा वारसा सर्व स्तरातील सर्व समाजातील युवकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो असे देखील मुख्य समन्वयक आमदार पाटील यांनी नमूद केले.

    नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कल्याण येथील शहरी ग्रामीण भागात आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांबरोबर विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण संशोधन व्हावे,ते प्रश्न सोडविण्याचा समाजातील सर्वच संघटनांना त्याचा लाभ व्हावा व या प्रश्नांच्या अभ्यासाचा दस्तऐवज तयार व्हावा या उद्देशानेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही पुढाकार घेऊन लोकनेते दि.बा.पाटील पाठ्यवृत्ती (फेलोशिप) सुरू करीत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी पत्रकातून आपले मत व्यक्त केले.

    येत्या काही दिवसांत पक्षाचे नेते अनिल शिदोरे, आ. राजू पाटील व तज्ज्ञांची एक समिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या फेलोशिपबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे या फेलोशिपचे समन्वयक नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. तसेच फेलोशिपचे मानधन किती असेल,एकूण किती अर्जदार निवडले जातील,निवड प्रक्रिया काय असेल,अर्ज करायची मुदत काय असेल,फेलोशिपसाठी वयोमर्यादा व फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक याबाबत सर्व माहिती पत्रकार परिषदेमधून देणार असल्याचे व या फेलोशिपबाबत अर्ज करण्यासाठी लवकरच एक संकेतस्थळ देखील कार्यान्वित करणार असल्याचे गजानन काळे यांनी माहिती देताना सांगितले.