Murder

उल्हासनगर (ulhasnagar)शहरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील एका महिलेचा तिच्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. (murder in ulhasnagar)शनिवारी तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर(mother killed by her daughter in ulhasnagar) सपासप वार करत तिची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

    उल्हासनगर : उल्हासनगर शहरामध्येे २० मार्चला ४० वर्षीय महिलेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या हत्येचा तपास करताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत महिलेच्या अल्पवयीन मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले. आई प्रेमाला विरोध करते आणि  प्रियकराला घरात येऊ देत नाही म्हणून मुलीने आईला धारदार शस्त्राचा वापर करुन मारले.

    उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील एका महिलेचा तिच्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. शनिवारी तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर सपासप वार करत तिची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी तांत्रिक आधारावर अल्पवयीन मुलीच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

    त्या मुलीच्या ३ मित्रांपैकी जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या आरोपी दिलजित यादवसोबत अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणाला मुलीच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मुलीने प्रियकर दिलजीत यादवच्या मदतीने आईला ठार मारायचा निर्णय घेतला. आरोपी प्रियकर दिलजित याने महिलेची राहत्या घरात हत्या केली आणि तो पसार झाला.

    दरम्यान काही वेळाने घरात मृतदेह असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शोध मोहीम राबवून पोलिसांनी संशयितांना पकडले. तेव्हा सगळे प्रकरण समजले. या हत्येप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचाही सहभाग असल्याने तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात केली आहे. तसेच दिलजितला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.