ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी, डेल्टा प्लसचा जिल्ह्यातील एकमेव रुग्ण झाला बरा

ठाण्यात(Thane) काही दिवसांपूर्वी एक डेल्टा प्लस(Delta Plus) बाधित आढळला होता तो मूळचा रायगड या ठिकाणचा होता. संबंधित रुग्णावर नवी मुंबई या ठिकाणी उपचार करण्यात आले होते. सध्या तो बरा झाला असून त्याला देखील डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

    ठाणे: महाराष्ट्र कोरोना विषाणू(Corona) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंट संकट उभं राहिलं. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ३४ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यातील प्रमुख जिल्हा असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात सध्या एकही डेल्टा प्लसचा अ‌ॅक्टिव्ह रुग्ण नाही.

    ठाणे जिल्हयात डेल्टा प्लसचा आता एकही रुग्ण नाही. ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक डेल्टा प्लस बाधित आढळला होता तो मूळचा रायगड या ठिकाणचा होता. संबंधित रुग्णावर नवी मुंबई या ठिकाणी उपचार करण्यात आले होते. सध्या तो बरा झाला असून त्याला देखील डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता इतर कोणालाही डेल्टा प्लसचा संसर्ग झालेला नाही.

    महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंट संकट उभं राहिलं. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ३४ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाले आहेत.

    व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.