नराधम मामाने केला ६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार

नराधम मामा हा शेजारी राहत असून त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेवर वारंवार तिचा विनयभंग करून अत्याचार करत होता.

    कल्याण (Kalyan) : मामा-भाचीच्या नात्याला (Uncle-niece relationship) काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आली आहे. एका ६ वर्षांच्या भाचीवर नराधम मामानेच बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    नराधम मामा हा शेजारी राहत असून त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेवर वारंवार तिचा विनयभंग करून अत्याचार करत होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना पाहिले असता त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली पीडित  मुलीच्या आईने हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

    आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात गुरुवारी हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.