डोंबिवली: १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांकडून नऊ महिने सामूहिक बलात्कार; ८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात सुमारे 800 पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिने आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता( Dombivali: A 15-year-old girl was gang-raped by 33 men for nine months; 800 page indictment filed in court). या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

    डोंबिवली : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात सुमारे 800 पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिने आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता( Dombivali: A 15-year-old girl was gang-raped by 33 men for nine months; 800 page indictment filed in court). या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

    २३ सप्टेंबर रोजी मानपाडा हद्दीत ही घटना घडली होती. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्याचा तपास जलद गतीने पूर्ण करून मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात सुमारे 800 पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना १२१ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.