डोंबिवली-बदलापूर रोडवरची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

कल्याण शीळ रोडवरील खोणी गावाजवळ एमआयडिसीची पाईपलाईन फुटली. 1772 मिमी व्यासाची ही पाईपलाईन असून आज पहाटेच्या दरम्यान कोणी या परिसरामध्ये ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

    ठाणे : कल्याण शीळ रोडवरील खोणी गावाजवळ एमआयडिसीची पाईपलाईन फुटली. 1772 मिमी व्यासाची ही पाईपलाईन असून आज पहाटेच्या दरम्यान कोणी या परिसरामध्ये ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून या पाण्याला तोच इतका होता की या पाण्याचा फवारा जमिनीपासून 30 ते 40 फूट उंचीपर्यंत उडत होता यामुळे खोणी रोड वर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

    सध्या डोंबिवली एमआयडीसीचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले असून वारंवार अशाप्रकारे पाईपलाईन फुटत असल्याने प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.