डोंबिवलीतील रहिवाशांना दुरुस्तीची बिले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप!

सुधारित मालमत्ता कर बिले दुरुस्ती करून देण्याबाबत पालिका परिक्षेत्रातील डोंबिवली आणि एमआयडीसीसह १८ गावांतील मालमत्ता कर आकारणी कमी करण्याचा निर्णय मागील नोव्हेंबर महिन्यात दिवाळी पूर्वी झाला होता. त्यामुळे मालमत्ता कर आकारणी बिले कमी करण्यासाठी रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर करयोग्यमूल्य दराप्रमाणे कर आकारणी करून ती दुरुस्ती करून रहिवाशांना सुधारित कमी केलेले बिल देण्यात येणार होते. अद्याप दुरुस्तीची बिले रहिवाशांना दिली गेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

डोंबिवली (Dombiwali).  सुधारित मालमत्ता कर बिले दुरुस्ती करून देण्याबाबत पालिका परिक्षेत्रातील डोंबिवली आणि एमआयडीसीसह १८ गावांतील मालमत्ता कर आकारणी कमी करण्याचा निर्णय मागील नोव्हेंबर महिन्यात दिवाळी पूर्वी झाला होता. त्यामुळे मालमत्ता कर आकारणी बिले कमी करण्यासाठी रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर करयोग्यमूल्य दराप्रमाणे कर आकारणी करून ती दुरुस्ती करून रहिवाशांना सुधारित कमी केलेले बिल देण्यात येणार होते. अद्याप दुरुस्तीची बिले रहिवाशांना दिली गेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अर्जासोबत अलीकडील आलेले मालमत्ता कर बिल तसेच सन २००२ किंवा त्यापूर्वीचे बिल सोबत जोडण्यात सांगितले होते. दीड महिना होऊनही पालिका अधिकारी कानाडोळा करीत आहेत. जाचक कर आकारणी विरोधात गेल्या तीन वर्षांपासून येथील बहुतेक रहिवाशांनी आपली कर बिले भरली नव्हती. मालमत्ता कर कमी करण्याबाबत झालेला निर्णयामुळे येथील जनता आता कर बिले भरण्यासाठी मोठ्या आशेने तयार झाली आहे.

पालिकेवर येत्या काही दिवसांत सदर सुधारित बिले दुरुस्ती करून नागरिकांना दिल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक आपली मालमत्ता कर बिले भरतील तसेच त्यामुळे कराचा थकबाकी पोटी असलेली रक्कम वसूल होऊन मोठ्या प्रमाणात करापोटी रक्कम महापालिकेकडे जमा होईल असे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे सांगतात.