डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये शिक्षकाने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार

कल्याणमध्ये(Kalyan Crime) एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार(Sexual Abuse By Teacher) केल्याची खळबळजनक घटना घडली उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी(Kalyan Bajarpeth Police) नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक करून तपास सुरू केली आहे .

    कल्याण : डोंबिवलीतील(Dombivali Gang Rape) अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये(Kalyan Crime) एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार(Sexual Abuse By Teacher) केल्याची खळबळजनक घटना घडली उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी(Kalyan Bajarpeth Police) नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक करून तपास सुरू केली आहे .

    कल्याण पश्चिमेकडील एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय विद्यार्थिनी याच परिसरात राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होती.शिकवणी घेणारी शिक्षिका माहेरी गेल्याने या कालावधीत शिक्क्षिकेचा पती मुदर फकरुद्दीन तालवला (४२) शिकवणीतील विद्यार्थ्यांची शिकवणी गेल्या दीड महिन्यापासून घेत होता.

    काही दिवसांपासून आठ वर्षीय विद्यार्थिनी शिकवणीसाठी जात नसल्याने तिच्या आईने शिकवणीला का जात नाही या बाबत विचारणा केली असता ती भीतीच्या छायेखाली असल्याचे दिसून आले. मुलगी रडू लागल्याने आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला हावभाव करुन दाखविला. त्यानंतर मुलीसोबत घडलेला प्रकार आईला समजला. अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने या किळसवाण्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

    या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी सखल चौकशी सुरु केली. या प्रकरणातील नराधाम शिक्षक मुदर तालवाला याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.