WORK FROM HOME

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण हे महागात पडू लागले आहे. कारण सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव(electronic goods prize hike) वाढले आहेत.

सुरेश साळवे, ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे(lockdown) अनेक व्यवहार बंद झाले. अनेकांना वर्क फ्रॉम होमचे(work from home) आदेश देण्यात आले. तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांना टाळे लागले. त्यानंतर २२ मार्चपासून आजपर्यंत शाळा बंदच आहेत. अनेक कर्मचारी हे आजही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण हे महागात पडू लागले आहे. कारण सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव(electronic goods prize hike) वाढले आहेत. नेटचा अतिरिक्त भार सर्वसामान्य माणसाला सोसावा लागत आहे. दुसरीकडे वर्क फ्रॉम होम मुले मोबाईल, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत तब्बल २ ते ५ हजार रुपयांची वाढ झालेली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणसाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

लॅपटॉप घेण्यासाठी आलो आहे. जुना लॅपटॉप खराब झाला. त्याच्या दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. लॅपटॉपच्या किमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे अर्ध्या पगारात आता वर्क फ्रॉम होम हे महागात पडत आहे. लॅपटॉपच्या किमतीत २ हजार ते ५ हजारापर्यंत वाढ झालेली आहे. ऑफिसमधून घरूनच काम करा म्हणत आहे. त्यामुळे भाव जरी वाढला तरीही खरेदी करणे आवश्यक आहे.

-गणेश कांबळे , ग्राहक

मार्चपासून लॉकडाऊन लागू झाला. त्यासोबतच वर्क फ्रॉम होम सुरु झाले आणि काही काळाने मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. पगार बंद झाला किंवा अर्धा झाला. मात्र खर्च वाढला. शाळेचे ऑनलाईन शिक्षण आणि क्लासेसचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने शाळेची आणि क्लासेसची फी ही द्यावीच लागल्याने सर्वसामान्य माणसाची परिस्थिती ‘आमदनी अठ्ठानी , खर्चा रुपया’ अशी झालेली आहे.

लॉकडाऊननंतर लॅपटॉप आणि मोबाईल यांच्या किंमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहक मात्र वाढीव किमतीची झिकझिक करतात. लॉकडाऊनपूर्वी आणि आता किमतीत २ ते ५ हजाराची वाढ झालेली आहे. त्यामुळे धंदा मार खात आहे. महागाई वाढली. तसेच इंधनाचे भाव वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वास्तूच्या किमतीही वाढलेल्या आहेत.

- संजय यादव, इलेक्ट्रॉनिक वास्तूचे होलसेल व्यापारी

घरातून काम करणाऱ्या नोकरदार खाजगी कंपन्या, आयटी सेक्टरमधील कर्मचारी यांना लॅपटॉप गरजेचा आहे, काही लोक मोठ्या किमतीचा मोबाईलवरही काम करतात .मात्र लॅपटॉप सोबतच मोबाईलही महागले आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी नव्या मोबाईल घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पूर्वी २०० रुपयाने मोबाईल रिचार्ज करून महिना लोटता येत होता. मात्र आता घरात इंटरनेट घेणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग स्वतःला आणि घरच्या लोकांना आणि विशेषतः वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणासाठी अधिक होती. हाही अतिरिक्त  खर्च वाढलेला आहे. मात्र पगार कमी मिळत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.