
लिफ्ट (Lift Collapsed In Ambernath) कोसळून सात महिला जखमी (Injured) झाल्याची घटना अंबरनाथमधील (Ambernath) निलयोग नगरमध्ये घडली आहे. या महिलांपैकी दोघींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
अंबरनाथ : ओव्हरलोड झाल्याने दुसऱ्या माळ्यावरुन लिफ्ट (Lift Collapsed In Ambernath) कोसळून सात महिला जखमी (Injured) झाल्याची घटना अंबरनाथमधील (Ambernath) निलयोग नगरमध्ये घडली आहे. या महिलांपैकी दोघींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. विद्या सुर्वे आणि सुमन दास अशी गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.
इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला शिरल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की २ महिलांचे पाय जागीच मोडले. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्या सुर्वे आणि सुमन दास यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी लिफ्टने गेल्यास किती महागात पडू शकतं, हे यावरून समोर आलं आहे.
याबाबत या इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांना विचारले असता, ही इमारत अतिशय नवीन असून लिफ्ट खराब होण्याचे काही कारण नव्हते. मात्र लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने लिफ्ट कोसळल्याचे त्यांनी सांगितले.