A womans throat slit from a love affair

नग्नावस्थेत नववीवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यामुळे ऐन दिवाळीत विरारमध्ये खळबळ उडाली आहे(Murder In Vasai). १७ दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.

    वसई : नग्नावस्थेत नववीवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यामुळे ऐन दिवाळीत विरारमध्ये खळबळ उडाली आहे(Murder In Vasai). १७ दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.

    विरार पूर्वेकडील कारगिल नगर तुळजाभवानी संकुल बिल्डींग नंबर ६ च्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मृत तरुणीचा विवाह १७ दिवसांपूर्वीच कांबळे नावाच्या तरुणाशी झाला होता. तिचे पती रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. शनिवारी सकाळी कामावरून परतल्यावर तर याचा मृतदेह नग्नावस्थेत आणि हाताची नस कापलेल्या अवस्थेत त्याला आढळून आला. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने विरार पोलीस ठाण्यात सदर खबर दिली.

    घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही हत्या आहे की आत्महत्या? हे अजून स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.