fake message for valentine day

फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा आला की तरुणांना वेड लागते ते व्हॅलेंटाईन डे(valentine day) चे ! मात्र याच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फेक मेसेजेस(fake messages) सध्या व्हायरल(viral fake messages) होत आहे.

    ठाणे: फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा आला की तरुणांना वेड लागते ते व्हॅलेंटाईन डे(valentine day) चे ! मात्र याच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फेक मेसेजेस(fake messages) सध्या व्हायरल(viral fake messages) होत आहे. या मेसेजमुळे फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाणे पोलिसांची सायबर टीम(cyber team) कामाला लागली आहे.

    ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर अनेक ऑफर देणारे मेसेजेस आपल्याला येत असताना, असाच एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होत आहे. ऑफरच्या नावाखाली एका लिंकद्वारे लोकांची फसवणूक केली जात असल्याचे ठाणे पोलिसांना समजले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनेक तरुण तरुणींना त्याच्या मोबाईल वर ताज सारख्या पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ७ दिवसांचा विकेंड ऑफर मिळणार असल्याचे फेक मेसेजमुळे ठाणे पोलीस सावध झाले असून येणाऱ्या कोणत्याही संदेश लक्ष देऊ नका आणि कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका, असे आवाहन ठाणे सायबर पोलिसांनी केले आहे.

    व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फ्री गिफ्ट कार्ड आणि फ्री कुपन मिळत असल्याची लिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ताज हॉटेल मध्ये राहण्यासाठी कार्ड तसेच डी मार्ट मध्ये फ्री शॉपीग मिळत असल्याचा संदेश सार्वत्रिक पसरला आहे. या वेबसाईटवर गिफ्ट कार्ड तसेच ओके क्लिक केल्यावर दुसरे पेज ओपन होते , तिथे काही प्रश्न विचारले जातात . त्याची उत्तर दिल्यानंतर आणखीन एक पेज ओपन होते जिथे बारा बॉक्स दिसतात. या वरती क्लिक केल्यावर काही गिफ्ट कार्ड जिंकता येतात, त्याचबरोबर हा मेसेज इतर पाच ग्रुप आणि २० लोकांना पाठवन्यास सांगितले जाते.

    पुण्यात काही नागरिकांना असे मेसेजेस पाठवून फसवणूक करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यात देखील असे मेसेजेस अनेकांना येत असून कोणीही या लिंकवर क्लीक करू नका. प्रामुख्याने कॉलेजमधील तरुणांना असे मेसेजेस पाठवले जात असून कोणीही बळी पडू नका ,असे आवाहन करण्यात येत आहे. असे ऑफरचे मेसेजेस किंवा कॉल आले की जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलिसांना संपर्क करा.

    - संजय जाधव,पोलीस उपायुक्त, सायबर सेल, ठाणे

    व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून मोफत स्कीम कज आमिष दाखवून एखादा संदेश आल्यास त्यातील लिंक वर क्लिक करून स्वतःची माहिती भरू नये तसेच या संदर्भात कोणी अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याला बँक खात्याचा तपशील किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.