apmc farmers got money

कांदा शेतकऱ्यांचे (Farmers Got Their Money Back) वीस लाख एक्केचाळीस हजार रुपये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे (APMC) परत मिळले आहेत.

  नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे (APMC) कांदा शेतकऱ्यांचे (Farmers Got Their Money Back) वीस लाख एक्केचाळीस हजार रुपये परत मिळले आहेत. नवी मुंबईतील (Navi Mumbai) कांदा बटाटा बाजार आवारात चांदवड जि.नाशिक, व पारनेर जिल्हा अहमदनगर (Ahmadnagar) येथील एकूण २७ शेतकऱ्यांनी त्यांनी उत्पादित केलेला कांदा हा शेतमाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केट येथे विक्रीसाठी मे.कादरी ट्रेडिंग कंपनी गाळा क्र.ई-९९ यांच्याकडे पाठवला होता.

  दरम्यानच्या कालावधीत या कंपनीचे चालक इस्लाम इस्माईल इद्रिसी यांचे कोरोना कालावधीत निधन झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले होते. बाजार समितीने शेतकऱ्यांचे हे पैसे वसूल करून दिले आहेत.

  आमचा सहकारी व्यापारी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूमुखी पडला होता. त्यामुळे त्याच्याकडे शेतकऱ्यांचे पैसे होते. त्यांच्या पत्नीला आम्ही बाजार समितीतर्फे सर्व व्यवहार समजावून सांगत व तांत्रिक बाबी पूर्ण करत शेतकऱ्यांना हे पैसे मिळवून दिले. शेतकऱ्यांना मानसन्मानासह धनादेश सुपूर्द केले. आम्ही इथे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच आहोत.त्यांच्यासाठीच बाजार समिती स्थापन झालेली आहे. पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय ? अशी भीती व्यक्त होत असताना दीड वर्ष रखडलेले पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.

  - अशोक वाळूंज , संचालक , कांदा बटाटा मार्केट, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

  कांदा उत्पादक शेतकरी यांनी बाजार समितीकडे कांदा शेतमाल विक्रीची रक्कम मिळावी अशी विनंती केली होती. याबाबत बाजार समितीमार्फत संचालक अशोक वाळुंज तसेच गाळाबमालक यांच्यावतीने त्यांचे आप्तेष्ट व्यापारी नसीम सिद्दीकी, बाजार आवाराचे उपसचीव  विठ्ठल राठोड, बाळासाहेब टाव्हरे, यांनी रक्कम वसुल करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

  अखेर त्यास यश येऊन गुरुवार रोजी शेतमाल विक्रिची रक्कम रुपये वीस लाख एक्केचाळीस हजार रुपयाचे धनादेश बाजार समितीचे प्र.सचिव प्रकाश अष्टेकर यांचे हस्ते बाळू  जामदार व इतर शेतकरी चांदवड जि.नाशिक तसेच मोहसीन अख्तार पठाण, पारनेर, जि.अहमदनगर यांना सुपूर्द करण्यात आले. याबाबत संबंधित उपस्थित शेतकऱ्यांनी धनादेश मिळाल्यानंतर बाजार समितीचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.