rape

डोंबिवलीत (Dombivali) विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या (Vishnu Nagar Police Station) हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्याच ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Father Raped Daughter) केले आहेत.

    डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali) पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या (Vishnu Nagar Police Station) हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्याच ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Father Raped 9 Year Old Daughter) केले आहेत. धक्कादायक म्हणजे हा बाप पीडित ९ वर्षांच्या मुलीला आणि तिच्या ८ महिन्याच्या बहिणीला दारू पाजायचा. विष्णूनगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डोंबिवलीमध्ये आई वडिलांसोबत राहते. मुलींची आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून बापाने मुलीशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.तसेच तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिली. मुलीने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. याच दरम्यान आरोपी बाप मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन भांडायचा, आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजायचा. याला विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीलाही बेदम मारहाण करायचा. रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस स्टेशन गाठून सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर या बापाला अटक करण्यात आली आहे.