ठाण्यात माकडांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच, पाचव्या माकडाचा यामुळे झाला मृत्यू

मृत माकड हे अंदाजे १ ते २ वर्षाचे मादी जातीचे आहे. हे माकड उंचावरून  उडी मारताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. सादर माकडाच्या मृत्यूची माहिती वनविभाग अधिकारी यांना देण्यात आली. ठाण्यात चार वानरांचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महिन्याभरातच पाचव्या माकडाचाही मृत्यू झाल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे : ठाण्यात मागील महिन्यात एकाच ठिकाणी चार वानर  वागळे  इस्टेट परिसरात ठार झाले. त्यानंतर सोमवारी पहाटे आणखी एक माकड ठाण्याच्या रामनगर परिसरात गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याने एकाच खळबळ उडाली. वानरांनंतर आता माकड हे वनविभागाच्या डोक्याला ताप ठरत आहेत. जखमी माकडाला उपचारासाठी ठाण्याच्या  प्राणी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी  बुद्ध विहार,  रोड नंबर २८,  राम नगर, वागळे इस्टेट, ठाणे या ठिकाणी १ माकड जखमी अवस्थेत पडल्याची माहिती ठाणे पालिका आपत्ती व्यवथापन दलाला मिळाली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने माकडाला त्वरित उपचारासाठी एस. पी. सी. ए. हॉस्पिटल, ब्रम्हांड, ठाणे येथे वन अधिकारी यांच्या परवागीने दाखल केले. दरम्यान माकडावर उपचार सुरु असतानाच दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास माकडाचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली.