bhivandi fire

भिवंडी ग्रामीण भागातील गोदामास रात्री ७ वाजता आग लागण्याची घटना घडून १२ तास उलटत नाहीत तर सकाळी शहरातील नारपोली कृष्णा नगर येथील एम्पायर डाईंगला भीषण आग(fire in empire dying company) लागण्याची घटना घडली आहे.

भिवंडी:भिवंडी(bhivandi) शहर तसेच गोदाम पट्ट्यात आगीच्या(fire) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वर्ष अखेरीस या आगी अपघाताने लागतात की लावल्या जातात अशी चर्चा सुरू झाली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील गोदामास रात्री ७ वाजता आग लागण्याची घटना घडून १२ तास उलटत नाहीत तर सकाळी शहरातील नारपोली कृष्णा नगर येथील एम्पायर डाईंगला  भीषण आग(fire in empire dying company) लागण्याची घटना घडली आहे.

fire brigade at bhivandi
एम्पायर डाईंग ही कपड्यावर रंगप्रक्रिया करणारी डाईंग असून येथील बॉयलरमधून ऑइल लिकेज झाल्याने ते नजीकच्या कपड्यासह केमिकलवर उडाल्याने ही आग लागल्याने व ती झपाट्याने सर्वत्र पसरल्याने आगीच्या ज्वाला उंचपर्यंत दिसत होत्या .या डाईंगमध्ये त्यावेळी काही कामगार अडकून पडले असता त्यांनी भीतीने पळ काढला. इथे जवळच मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असून तेथील नागरीकांमध्ये बॉयलरचा स्फोट होण्याच्या भीतीने त्यांनी सुध्दा सुरक्षित स्थळी पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व त्यामुळे बॉयलर चा स्फोट झाला नाही. मात्र आगीत लाखो रुपयांचा कच्चा कपडा व यंत्रसामुग्री जाळून खाक झाली असून आगी वर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले आहे .

bhivandi dying mill fire

रविवारी सायंकाळी ७ वा च्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील  एफ/५ बी-२ या  कापड निर्मितीसाठी आवश्यक धागा साठविलेल्या गोदामास भीषण आग लागली होती.या आगीत गोदामात साठविलेला मोठा साठा असून तो आगीत जळून भस्मसात झाला आहे . घटनास्थळी भिवंडी व ठाणे अग्निशामक दलाचे जवानांनी फायर वाहन व वॉटर टँकरसहीत दाखल होत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र गोदाम संकुलात पाणी साठवणूक व्यवस्था नसल्याने आगीचा भडका वाढत असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे ही आग पूर्ण नियंत्रणात आणण्यात तब्बल दहा तास लागले.