meera bhayander employees giving application

दोन बाईकस्वारांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये(Firing On Meera Bhayander Corporation Engineer) काम करणारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत ( Attack On Dipak Khambit) यांच्यावर गोळीबार केला.

    ठाणे : बोरीवलीच्या कस्तुरबा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये काल गोळीबार(Firing) करण्यात आला. दोन बाईकस्वारांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये(Firing On Meera Bhayander Corporation Engineer) काम करणारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत ( Attack On Dipak Khambit) यांच्यावर गोळीबार केला. अभियंता मुंबईवरून मिरारोड स्थानकापर्यंत जात होते. दरम्यान  बोरीवली नॅशनल पार्क हायवेवर श्री कृष्णा कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या समोर खांबीत यांच्या मारुती स्विफ्ट डिझायरवर दोन राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अभियंता थोडक्यात बचावले. ते जखमी झाले आहेत.

    याप्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.आज या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून निषेध केला. तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना त्यासंदर्भातले निवेदन दिले.