First took Hanuman's blessing then stole! Pratap of Thane thief captured on camera; Watch Viral Video

असे म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा. पण कधी तुम्ही कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील ठाण्यातील नौपाडा येथील आहे(First took Hanuman's blessing then stole! Pratap of Thane thief captured on camera; Watch Viral Video). ज्याला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चोर आदर्शवादी आहे.

  मुंबई : असे म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा. पण कधी तुम्ही कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील ठाण्यातील नौपाडा येथील आहे(First took Hanuman’s blessing then stole! Pratap of Thane thief captured on camera; Watch Viral Video). ज्याला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चोर आदर्शवादी आहे.

  व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे, ज्यामध्ये एक चोर मंदिरातील दानपेटी चोरताना दिसत आहे. एक व्यक्ती मंदिरात प्रवेश करून इकडे-तिकडे पाहतो, त्यानंतर देवाच्या चरणांना स्पर्श करतो आणि नंतर मंदिरात ठेवलेली दानपेटी घेऊन पळून जातो. फुटेजमध्ये आणखी एक साथीदारही मंदिराबाहेर थांबल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी मंदिरातून बाहेर गेले असताना ही चोरी झाली असून ते परत आले असता पुतळ्यासमोरील दानपेटी गायब होती. दानपेटीत एक हजार रुपये असल्याचे पंडित यांनी सांगितले.

  फेसबुकवर शेअर

  30 सेकंदाचा हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘दानपेटी चोरण्यापूर्वी चोराने देवाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला..!’ या व्हीडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हीडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

  पोलिसांनी केली अटक

  याबाबत नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले की, ही चोरी मंदिरातील एका स्थानिक व्यक्तीने केली आहे. कारण केवळ एका स्थानिक व्यक्तीलाच हे चांगले ठाऊक असते की, कोणत्या वेळी मंदिरात कोण असते. सध्या सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्रे मोठ्या संख्येने स्थानिक लोकांना दाखवण्यात आली. त्यामुळे आम्हाला संशयितांच्या ओळखीबाबत अनेक सुगावा मिळाले. त्याआधारे पोलिसांनी राबोडी येथील केजस म्हसदे याला अटक केली. त्याने त्याच्या सहकाऱ्याची ओळख सांगितली आणि आता त्यालाही अटक करण्यात आली आहे.